MENU

Thursday, July 1, 2021

शाळा व्यवस्थापन समिती रचना

====================================
शासन निर्णय : 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २०० ९ मधील भाग - चार , कलम २१ अनुसार प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये , शाळा व्यवस्थापन समिती ( School Management Committee ) दिनांक ३० सप्टेंबर , २०१० पूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील . 
शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे असतील - 
१. सदर समिती किमान १२ ते १६ लोकांची राहील ( सदस्य सचिव वगळून ) . 
२. यापैकी किमान ७५ टक्के सदस्य बालकांचे आईवडील / पालक यामधून असतील . 
  • पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल . 
  • उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता - पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल . 
  • साधारणपणे पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल असे पहावे . 
३. उर्वरित २५ टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील . 
  • स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी - एक . ( स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करील ) 
  • शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक - एक 
  • पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ / बालविकास तज्ञ एक . 
४. वरील अ.क्र . २ मधील बालकांचे आईवडील / पालक सदस्यांमधून , सदर समिती , अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करील . 
५. शाळेचे मुख्याध्यापक / प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील . 
६ . या समितीतील एकूण सदस्यांपैकी ५० टक्के सदस्य महिला राहतील . 

No comments:

Post a Comment