नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
===========================
सर्वनामाचे प्रकार : एकूण ६
१ ] पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील वस्तूंचे तीन गट पडतात.
अ ] बोलणाऱ्यांचा गट
ब ] ज्यांच्याशी बोलतो त्याचा गट
क ] ज्यांच्याविषयी बोलतो त्यांचा गट
===========================
A ] प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणाऱ्या व्यक्तीने स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वापरलेले सर्वनाम प्रथम पुरुषी सर्वनाम होय.
उदा. - मी , आम्ही , आपण
मी शहरात राहतो.
आम्ही गावाला गेलो.
-----------------------------------
B ] व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम :
उदा. – तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
------------------------------------
C ] तृतीय पुरुषवाचक सर्वनाम :
उदा – तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
-----------------------------------
२] दर्शक सर्वनाम :
जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. - हा , ही , हे , तो , ती , ते
हा हत्ती आहे.
तो पुस्तक वाचत आहे.
-----------------------------------
3] संबंधी सर्वनामे :
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबधी सर्वनाम असे म्हणतात.
उदा. - जो , जी , जे , ज्या
------------------------------------
४] प्रश्नार्थक सर्वनाम :
वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामांचा उपयोग होतो त्यास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. - कोण , काय कोणास , कोणाला , कोणी
-----------------------------------
५ ] सामान्य / अनिश्चित सर्वनाम :
वाक्यात कोण , काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबाबत आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.
-----------------------------------
६ ] आत्मवाचक सर्वनामे :
' आपण ' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ' स्वतः ' असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
उदा. -मी त्याला स्वतः पाहिले.
-----------------------------------
No comments:
Post a Comment