दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदा. विशालने बाजारातून कांदे व बटाटे आणले.
------------------------------------
उभयान्वयी अव्यय यांचे मुख्यता दोन प्रकार पडतात.
१ ] प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्यय -
दोन समान वाक्य जोडणारे अव्यय.
उदा.
अ ] चिमणीच्या पिलाने घरट्याबाहेर मान
काढली व किलबिलाट केला.
ब ] विजा चमकू लागल्या आणि पावसाला
सुरुवात झाली.
------------------------------------
२ ] गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय -
एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य यांना जोडणारे अव्यय.
उदा.
अ ] तो म्हणाला की मी हरलो.
ब ] त्याला बढती मिळाली कारण त्याने
चोख कामगिरी केली.
----------------------------------
No comments:
Post a Comment