MENU

Sunday, September 25, 2022

शब्दयोगी अव्यय

शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा.

        पतंग झाडावर अडकला.

        पुस्तक टेबलाखाली पडली.

        मुले मैदानावर खेळतात.

---------------------------------

सामान्यतः शब्दयोगी अव्यय ही नामांना जोडून येतात. परंतु कधीकधी शब्दयोगी अव्यय क्रियापद आणि विशेषण यांनाही जोडून येतात.

उदा. -   

येईपर्यंत, बसल्यावर, बोलल्यामुळे, थोडासुद्धा, 

---------------------------------

शब्दयोगी अव्यय यांचे प्रकार -

कालवाचक - आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत.

स्थलवाचक - आज ,बाहेर, मागे, पुढे, अलीकडे,  

                       समोर, जवळ, नजीक, समक्ष.

कारणवाचक - मुळे, करून, हाती, द्वारा.

हेतूवाचक - कारणे ,साठी, अर्थी, निमित्त ,स्थळ.

तुलनावाचक - पेक्षा, तर, मध्ये.

योग्यतावाचक - योग्य ,सारखा, समान, प्रमाणे.

कैवल्यवाचक - मात्र ,पण, फक्त, केवळ.

संग्रहवाचक - सुद्धा, देखील, बारीक, फक्त, पण.

संबंधवाचक - विषयी, संबंधी.

साहचर्यवाचक - बरोबर, सह,सकट, सहित, समवेत.

भागवाचक - पैकी ,पोटी ,आतून.

विनिमयवाचक - बद्दल, ऐवजी, बदली, जागी.

विरोधवाचक  - विरुद्ध, उलट.

परिमाणवाचक - भर.

----------------------------------

No comments:

Post a Comment