-----------------------------------
सामान्य वर्ष :
एकूण दिवस = ३६५
= ५२ आठवडे + १ दिवस
सामान्य वर्षात १ दिवस जादा येतो म्हणून पुढील वर्षात त्याच तारखेचा वार एक दिवसांनी पुढे मोजावा.
उदा. १ जाने २००९ ला शनिवार असल्यास १ जानेवारी २०१० ला रविवार येईल.
सामान्य वर्षात १ जानेवारीला येणारा वार संपूर्ण वर्षात ५३ वेळा येतो. इतर वार ५२ वेळा येतात.
------------------------------------
लीप वर्ष :
ज्या वर्षाच्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जातो. ते लीप वर्ष असते.
उदा. २००० , १९९२ , २०२०
१] लीप वर्ष ३६६ दिवसांचे असते.
२] लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात.
लीप वर्षातील दिवस = ३६६ दिवस
= ५२ आठवडे + २ दिवस
लीप वर्षात २ दिवस जास्त असल्याने पुढील वर्षीचा त्याच तारखेचा वार दोन दिवसांनी पुढे जातो.
उदा. १ जाने. २०१३ ला सोमवार असल्यास १ जाने. २०१४ ला बुधवार येईल.
लीप वर्षात १ व २ जानेवारीला येणारा वार ५३ वेळा येतो. इतर वार ५२ वेळा येतात.
------------------------------------
१ ] दर सात दिवसांनी तोच वार येतो.
२] वर्षातील ३१ दिवसांचे महिने - ७
3] वर्षातील ३0 दिवसांचे महिने - ४
४] फेब्रुवारी महिना २८ किंवा 29 दिवसांचा असतो.
------------------------------------
महिन्यात ५ वेळा येणारे वार
महिन्याचे दिवस वारांची संख्या दिनांक
२८ 0 0
29 १ १
३० २ १ व २
३१ 3 १ , २ व 3
------------------------------------
एका वर्षात एकाच वारी येणारे दिन -
१] स्वातंत्र्य दिन ( १५ ऑगस्ट )
२] लोकमान्य टिळक पुण्यतिथी ( १ ऑगस्ट )
3] पंडित नेहरू जयंती - बालदिन ( १४ नोव्हेंबर )
४] डॉ. राधाकृष्णन जन्मदिन - शिक्षक दिन ( ५ सप्टेंबर )
-----------------------------------
एका वर्षात एकाच वारी येणारे दिन -
१] महाराष्ट्र दिन ( १ मे )
२] गांधी जयंती ( २ ऑक्टोबर )
3] शाहू महाराज जयंती ( 26 जून )
४] नाताळ ( २५ डिसेंबर )
------------------------------------
महिना आठवडे जादा दिवस
जानेवारी ४ 3 दिवस
फेब्रुवारी ४ 0 / १ दिवस
मार्च ४ 3 दिवस
एप्रिल ४ २ दिवस
मे ४ 3 दिवस
जून ४ २ दिवस
जुलै ४ 3 दिवस
ऑगस्ट ४ 3 दिवस
सप्टेंबर ४ २ दिवस
ऑक्टोबर ४ 3 दिवस
नोव्हेंबर ४ २ दिवस
डिसेंबर ४ 3 दिवस
---------------------------------
No comments:
Post a Comment