दृश्य किंवा अदृश्य वस्तू वा त्यांच्या गुणधर्म ला दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात .
उदा. पुस्तक ,कागद , मुलगा , देव , गोडी , इत्यादी .
=============================
१ ] सामान्य नाम :
एकाच समूहातील पदार्थांच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
सामान्यनाम हे जातीवाचक असते.
उदा. - नदी , पर्वत , मुलगा मुलगी , शहर , फुल , शाळा , राक्षस , देव , इत्यादी
=============================
२ ] विशेष नाम :
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.
विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते.
उदा. -
सामान्य नाम विशेष नाम
नदी गंगा , भीमा , नर्मदा
पर्वत हिमालय , सह्याद्री
मुलगा राजू , शंकर , प्रताप
मुलगी नेहा , आशा , नीलिमा
शहर पुणे , बारामती , मुंबई
=============================
3 ] भाववाचक नाम : [ धर्मवाचक नाम ]
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.
उदा. - गोडी , आनंद , कीर्ती , चांगुलपणा , बालपण
=============================
No comments:
Post a Comment