बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ ( RTE 2009 ) , मधील कलम २२ ( १ ) नुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावा . संबंधित केंद्रप्रमुख / समन्वयक यांनी आराखड्याचे मूल्यमापन करावे . हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला ( ग्रामपंचायत , नगरपरिषद , महानगरपालिका किंवा कटक मंडळ ) तात्काळ सादर करावयाचा आहे .
=====================================
शाळा विकास आराखडा चे आधार क्षेत्र :
शाळा विकास आराखडा हा पुढील चार क्षेत्रांवर आधारित राहील .
१. शाळा सुविधा
२. समता
३. गुणवत्ता
४. लोकसहभाग
=====================================
शाळा विकास आराखड्याचा उद्देश :
१. कृती आराखडा या माध्यमातून शालेय व्यस्थापन समिती चे शिक्षक , मुख्याध्यापक , पालक व ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळेच्या गरजा , बलस्थाने व उणीवा यांचा शोध घेवून कृती आराखडा तयार करणे .
२. शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा , गट / मनपा आराखडा , जिल्हा / राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे . म्हणून शाळा विकास आराखड्यातील आकडेवारी अचूक असावी .
३. उपरोक्त नमूद आधारक्षेत्रांमध्ये समन्वयक प्रस्थापित करून शालेय व्यस्थापन समितीच्या माध्यमातून शालेय विकास लोकसहभागाच्या माध्यमातून करवणे .
४. शाळेसमोर येणारी नवनवीन आवाहने स्थानिकांच्या मदतीने सोडविणे . त्यामुळे प्रस्ताविकाच्या शेवटी शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असावी असे नमूद आहे .
=====================================
शाळा विकास आराखडा डाऊनलोड करण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करा
=====================================
No comments:
Post a Comment