MENU

Wednesday, September 21, 2022

संधी - स्वरसंधी

वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

============================

संधीचे प्रकार : 

१ ) स्वरसंधी -   एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास ‘स्वरसंधी’ असे म्हणतात.

स्वरूप : स्वर + स्वर असे असते.

        उदा. देव + आलय = देवालय  

============================

२ )व्यंजन संधी :   जवळ जवळ येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन किंवा पहिले व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला ‘व्यंजन संधी’ म्हणतात.

        उदा. सज्जन = सत + जन [ त + ज ]

============================

 3 ) विसर्ग संधी : एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला ‘विसर्ग संधी’ म्हणतात.

        उदा. तपः + धन = तपोधन 

============================

No comments:

Post a Comment