---------------------------------
कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी असणारी जुळणी किंवा रचना यास प्रयोग असे म्हणतात.
---------------------------------
१ ] कर्तरी प्रयोग :
जेव्हा कर्त्याच्या लिंग , पुरुष , वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदा. राहुल क्रिकेट खेळतो. ( मूळ वाक्य )
उषा क्रिकेट खेळते. { लिंग बदल }
मुले क्रिकेट खेळतात. { वचन बदल }
मी क्रिकेट खेळतो. { पुरुष बदल }
कर्तरी प्रयोगाचे २ प्रकार पडतात.
अ ] सकर्मक कर्तरी प्रयोग :
कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक असेल तर त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा. ती गाणे गाते.
ब ] अकर्मक कर्तरी प्रयोग :
कर्तरी प्रयोगातील क्रियापद अकर्मक असेल तर त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा. ती घरी जाते.---------------------------------
२ ] कर्मणी प्रयोग :
जेव्हा कर्माच्या लिंग , पुरुष , वचनाप्रमाणे क्रियापद बदलते. तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात.
उदा. गौरवने आंबा खाल्ला. ( मूळ वाक्य )
गौरवने चिंच खाल्ली.
---------------------------------
3 ] भावे प्रयोग :
जेव्हा कर्ता किंवा कर्माच्या लिंग , पुरुष , वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात.
उदा. मुलाने बैलास मारले.
रामने बैलास मारले.
-----------------------------------
No comments:
Post a Comment