MENU

Saturday, September 24, 2022

क्रियाविशेषण अव्यय

क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जि अविकारी राहतात. त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

------------------------------------

१ ] कालवाचक क्रियाविशेषण अव्यय : 

जी अव्यय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.   मी दररोज व्यायाम करतो

    काल शाळा बंद होती

 ------------------------------------

२ ] स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय :

जी अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थळ दाखवतात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.   ईश्वर सर्वत्र आहे

    येथून समुद्र जवळ आहे

------------------------------------  

3 ] रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवतात त्यांना रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.    

रस्त्यातून जाताना सावकाश जपून चालावे

------------------------------------

४] संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिमाण दाखवतात त्यांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.   

  शाळेत आल्यावर आम्ही भरपूर अभ्यास केला.

        विनय वाचताना नेहमी अडखळतो.

------------------------------------

५] प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे रूप देतात त्या शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.   तू आमच्याकडे येणार का

------------------------------------

६] निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :

जे शब्द त्या वाक्यातील क्रियेचा नकार दाखवतात अशा शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.   तो चुकता अभ्यास करतो.

    तो तोंड उघडेल तर ना.

------------------------------------ 

No comments:

Post a Comment