वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात.
उदा. - राघव आंबा खातो.
विनय गाणे गातो.
-----------------------------------
क्रियापदाचे मुख्यतः पडणारे प्रकार
१ ] सकर्मक क्रियापद :
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते , त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. - आरोही लाडू खाते.
विशाल पत्र लिहितो.
------------------------------------
२] अकर्मक क्रियापद :
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता नसते , त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात.
उदा. - विजय रस्त्यात पडला.
राधा उद्या दिल्लीला जाईल.
-------------------------------------
No comments:
Post a Comment