MENU

Tuesday, September 20, 2022

मराठी वर्णमाला

 वर्ण : 

 तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात.

==========================

मराठी वर्णमाला :

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, 

ए,अॅ, ऑ ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, 

च, छ, ज, झ, त्र, 

ट, ठ, ड, ढ, ण, 

त, थ, द, ध, न, 

प, फ, ब, भ, म, 

य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

==========================

स्वर : 

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाची मदत न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.

==========================

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, 

ए,अॅ, ऑ ऐ, ओ, औ, अं, अ: 

========================== 

स्वराचे प्रकार तीन आहेत - 

१ ) र्‍हस्व स्वर 

२ ) दीर्घ स्वर 

३ ) संयुक्त स्वर

==========================

१ ) र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.

 अ, इ, ऋ, उ

==========================

२ ) दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.

 आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

==========================

 ३ ) संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.

संयुक्त स्वर 4 आहेत.

  • ए – अ+इ/ई
  • ऐ – आ+इ/ई
  • ओ – अ+उ/ऊ
  • औ – आ+उ/ऊ

==========================

४ ) सजातीय स्वर :

एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

    उदा.  अ-आ, 

            उ-ऊ, 

            ओ-औ, 

            इ-ई, 

            ए-ऐ

==========================

 5 ) विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.

     उदा. अ-ई, 

            उ-ए, 

            ओ-ऋ

==========================

स्वरादी :

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.

स्वर + आदी – स्वरादी

  • दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  • दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  • उदा. बॅट, कॉल 
  • ==========================

No comments:

Post a Comment