MENU

Monday, September 26, 2022

भौमितिक आकार

१ ] रेषाखंड : 

कोणतेही दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात. 


------------------------------------

२] किरण : 

एका बिंदुतून निघणाऱ्या आणि एकाच दिशेने अमर्याद अंतर जाणाऱ्या रेषेला किरण असे म्हणतात.

-----------------------------------

3] रेषा : 

दोन्ही दिशेला अमर्याद अंतर जाणारी आकृती म्हणजे रेषा होय.

----------------------------------

४ ] त्रिकोण : 

    त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात.

    त्रिकोणाला 3 बाजू असतात.

    त्रिकोणाला 3 कोन असतात.


त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. 

        अ ] समभूज त्रिकोण

        ब ] समद्विभूज त्रिकोण 

       क ] विषमभूज त्रिकोण 

----------------------------------

५ ] चौरस : 

चार समान बाजू आणि चार समान कोन असणाऱ्या आकृतीला चौरस असे म्हणतात.


    चौरसाला ४ शिरोबिंदू असतात.

    चौरसाला ४ बाजू असतात.

    चौरसाला ४ कोन असतात.

----------------------------------

६] आयत : 

सर्व कोन काटकोन आणि समोरासमोरच्या बाजू समान असणाऱ्या आकृतीला आयत असे म्हणतात.


    आयताला ४ शिरोबिंदू असतात.

    आयताला ४ बाजू असतात.

    आयताला ४ कोन असतात.

 

----------------------------------

७] इष्टीकाचिती : 

लांबी , रुंदी व उंची असणाऱ्या आकृतीला इष्टीकाचिती असे म्हणतात.

    अ ] एकूण शिरोबिंदू - ८

    ब ] एकूण कडा  - 12

    क ] एकूण पृष्ठ - ६

----------------------------------

८ ] घन : 

लांबी , रुंदी व उंची समान असणाऱ्या आकृतीला घन असे म्हणतात.

    अ ] एकूण शिरोबिंदू - ८

    ब ] एकूण कडा  - 12

    क ] एकूण पृष्ठ - ६


 -----------------------------------

No comments:

Post a Comment