नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात.
-------------------------------------
विशेषणाचे प्रकार
१ ] गुणविशेषण
२ ] संख्याविशेषण
3 ] सार्वनामिक विशेषण
-------------------------------------
१ ] गुणविशेषण -
ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो , त्यास गुणविशेषण असे म्हणतात.
उदा. - मोठी मुले
रेखीव चित्र
शुभ्र ससा
-------------------------------------
२ ] संख्याविशेषण -
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते, त्यास संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा. - तीन , नववा , पुष्कळ , इत्यादी
याचे पाच प्रकार आहेत
अ ] गणनावाचक संख्याविशेषण :
ज्या विशेषणांचा उपयोग केवल गणना करण्याकडे होतो , त्यास गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा . दहा मुले
साठ रुपये
------------------------------------
ब ] क्रमवाचक संख्याविशेषण
जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवतात, त्यांना क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा . - पहिला वर्ग
सातवी इयत्ता
------------------------------------
क ] आवृत्तीवाचक संख्याविशेषण :
जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली आहे हे दर्शविते त्यास आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा. - दुप्पट पैसे
दुहेरी आनंद
------------------------------------
ड ] पृथकत्ववाचक विशेषण :
जी विशेषणे वेगवेगळा किंवा पृथक असा बोध करून देतात त्यांना पृथकत्ववाचक विशेषण असे म्हणतात.
उदा. - एकेक मुलगा
पाच पाचचा गट
------------------------------------
इ ] अनिश्चित संख्याविशेषण :
जी विशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाहीत , त्यांना अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात.
उदा. - सर्व रस्ते
काही प्राणी
-------------------------------------
3 ] सार्वनामिक विशेषण -
सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदा. - हा पक्षी
तो मनुष्य
------------------------------------
४ ] नामसाधित विशेषण -
नामापासून बनलेल्या विशेषणाना नामसाधित विशेषण असे म्हणतात.
उदा. - माझ्या मित्राचे कापड - दुकान आहे
श्यामला फळ - भाजी फार आवडते.
------------------------------------
५ ] धातूसाधित विशेषण :
धातूपासून कृदंतरूप बनते. जेव्हा कृदंतरूपाचा विशेषणासारखा उपयोग होतो , तेव्हा त्यास धातूसाधित विशेषण असे म्हणतात.
उदा. - हसरी मुले
वाहती नदी
पेटती ज्योत
------------------------------------
६ ] अव्ययसाधित विशेषण :
अव्ययापासून तयार झालेल्या विशेषणांना अव्ययसाधित विशेषण असे म्हणतात.
उदा. - वरचा मजला
मागील दरवाजा
------------------------------------
No comments:
Post a Comment