MENU

Wednesday, November 18, 2026

बदली झाल्यानंतर बदलीच्या ठिकाणी हजर होणे बाबत

शिक्षक बदलीनंतर तात्काळ नवीन शाळेवर हजर व्हा.
बदली आदेशाला स्थगिती नसताना रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार.
शासन परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे
1\. तात्काळ रुजू होणे बंधनकारक : बदली झालेल्या शिक्षकांनी नवीन पदस्थापनेच्या शाळेवर तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.
2\. तक्रारीचा विचार रुजू झाल्यानंतरच : बदलीविरोधात तक्रार अर्ज किंवा निवेदन दिले असल्यास त्याचा विचार नवीन शाळेवर रुजू झाल्यानंतरच केला जाईल.
3\. रुजू न झाल्यास कारवाई : कार्यमुक्तीच्या दिनांकानंतर नवीन शाळेवर रुजू न झाल्यास संबंधित शिक्षकांवर नियमानुसार तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
4\. अपील निर्णयाची मुदत : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बदलीविरोधातील अपीलावर 30 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा.
5\. विभागीय आयुक्तांकडे दाद : समितीच्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षकांना 7 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे दाद मागता येईल.
6\. विभागीय आयुक्तांचा निर्णय : विभागीय आयुक्तांनी शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा. त्यांचा निर्णय अंतिम राहील.
7\. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे : शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.

No comments:

Post a Comment